Breaking

Monday, 25 March 2024

March 25, 2024

शाळा प्रवेशोत्सव 2024 | शुभारंभ आनंदी शिक्षणाचा

शाळा प्रवेशोत्सव 2024 | शुभारंभ आनंदी शिक्षणाचा

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांच्या आनंदांनतर विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे तसेच त्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे, यासाठीच शाळा प्रवेशोत्सव निमित्ताने पथनाट्यातून म. न. पा. शाळेतील शिक्षणाचे महत्व...

Saturday, 23 March 2024

March 23, 2024

शहीद दिवस प्रश्नमंजुषा | 23 March Shahid Diwas Quiz

Saturday, 16 March 2024

March 16, 2024

पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा | पर्यावरण जागरूकता अभियान | पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा PDF डाऊनलोड | Environment Pledge

पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा | पर्यावरण जागरूकता अभियान |  Environment Pledge
पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा


PDF डाऊनलोड करा

👇👇👇👇

CLICK HERE FOR DOWNLOAD


मला एक पर्यावरण-मित्र व्हायचे आहे. एक पर्यावरण मित्र म्हणून मला याची जाणीव आहे, की पृथ्वी एकमेकांवर अवलंबून एक गुंतागुंतीची प्रणाली आहे. सूर्य हा आपल्या ऊर्जेचा स्त्रोत आहे. समृद्धी शेवाळ हा पृथ्वीचा ऑक्सिजनचा सर्वांत मोठा स्त्रोत आहे.

मी माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवेन, तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्या एकल वापर प्लॅस्टिकसारख्या उत्पादनांचा वापर करणार नाही. कारण, हे प्लॅस्टिक कुजत नाही आणि ओढे, नदी आणि नंतर समृद्धी जीवनास हानिकारक ठरत आहे.

पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी पिण्यालायक आहे, याची मला जाणीव आहे. म्हणून मी शाळेत आणि घरात पाण्याचा काटकसरीने वापर करेन. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण आणि पुनर्वापर, तसेच अन्य वस्तूंचा पुनर्वापर करून मी पर्यावरणपूरक संस्कृतीला प्रोत्साहन देईन. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या माध्यमातून मी पाण्याचे संवर्धन करेन आणि हाच संदेश कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवेन.

मी कोळसा जाळून बनविलेल्या ऊर्जेचा वापर कमी करेन आणि त्यासाठी सौर, बायोगॅस इ. ऊर्जेचा वापर करण्याचा मी शक्य तेवढा प्रयत्न करेन.

मी माझ्या परिसरातील जीवांच्या विविधतेला समजून घेईन, माझ्यामुळे इतर जीवांना कमीत कमी त्रास होईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन.

एक मोठे झाड प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे दरवर्षी २० किलो कार्बन डायॉक्साईड शोषून घेते. याच क्रियेद्वारे प्रत्येक मोठे झाड प्रतिवर्षी १४ किलो ऑक्सिजन देते.

मी स्वतः दहा मोठ्या होणाऱ्या झाडांची लागवड आणि जोपासना करेन. तसेच माझे पालक, भाऊ आणि बहिणी, तसेच माझे शेजारी दहा झाडांची लागवड आणि जोपासना करतील, याची दक्षता घेईन. या मोहिमेतील एक दूत म्हणून मी काम करेन.

माझे घर, परिसर आणि विद्यार्थी मित्रांमध्ये मी पर्यावरण संवर्धनविषयक जागरूकता निर्माण करेन. मोठेपणी मी ज्या कोणत्याही व्यवसायात जाईन, तिथे पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन होईल असे निर्णय घेईन.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

पर्यावरण राजदूत, यांनी दिलेल्या प्रतिज्ञेपासून प्रेरित.

Friday, 15 March 2024

March 15, 2024

जागतिक ग्राहक हक्क दिन प्रश्नमंजुषा | World Consumer Rights Day

जागतिक ग्राहक हक्क दिन प्रश्नमंजुषा | World Consumer Rights Day

५ मार्च हा दिवस जगभरात "जागतिक ग्राहक हक्क दिन' म्हणून साजरा केला जात असतो. ग्राहकांना त्यांच्या सर्व संरक्षण व हक्कांबद्दल माहिती तसेच वस्तूचे प्रमाण, गुणवत्ता, शुद्धता इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हाच हा दिवस साजरा करण्यात मागचा उद्देश होय.

Thursday, 14 March 2024

March 14, 2024

असे जगावे इ. 7 वी मराठी कविता साभिनय गायन | 7 वी मराठी कविता असे जगावे | 7 वी मराठी कविता गायन

असे जगावे इ. 7 वी मराठी कविता साभिनय गायन | 7 वी मराठी कविता असे जगावे | 7 वी मराठी कविता गायनकवी गुरू ठाकूर यांच्या "असे जगावे..." या जगण्याला उभारी व आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या कवितेचे अभिनयासह गायन...

असे जगावे छाताडावर

आव्हानाचे लावुन अत्तर,

नजर रोखुनी नजरे मध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर !!

Wednesday, 6 March 2024

March 06, 2024

जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा | Jagatik-Mahila--Din-Quiz

जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा | Jagatik-Mahila--Din-Quiz

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महिला दिनानिमित्त कर्तबगार भारतीय महिलांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा म्हणून ही प्रश्नमंजुषा....

Tuesday, 5 March 2024

March 05, 2024

हृदयाचे आकुंचन व प्रसरण, ज्वालामुखी तयार करणे व हवेचा दाब अभ्यासणे | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रम

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध विषयांचे स्वतः प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन यावर्षी वेगळ्या तऱ्हेने साजरा केला...

🔬हृदयाचे आकुंचन व प्रसरण

March 05, 2024

वॉटर फाउंटन, वॉटर रेनबो हळद व डिटर्जंट पावडर अभिक्रिया | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रम

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध विषयांचे स्वतः प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन यावर्षी वेगळ्या तऱ्हेने साजरा केला...

🔬वॉटर फाउंटन, वॉटर रेनबो हळद व डिटर्जंट पावडर अभिक्रिया

Monday, 4 March 2024

March 04, 2024

लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर | प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रम

प्रयोगातून विज्ञानाचे ज्ञान | राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रम

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध विषयांचे स्वतः प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन यावर्षी वेगळ्या तऱ्हेने साजरा केला...

🔬लाव्हा लॅम्प, फुग्याची डॉल, नॅचरल वॉटर फिल्टर

🔬हृदयाचे आकुंचन व प्रसरण

🔬वॉटर फाउंटन, वॉटर रेनबो हळद व डिटर्जंट पावडर अभिक्रिया

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...