PDF डाऊनलोड करा
👇👇👇👇
मला एक पर्यावरण-मित्र व्हायचे आहे. एक पर्यावरण मित्र म्हणून मला याची जाणीव आहे, की पृथ्वी एकमेकांवर अवलंबून एक गुंतागुंतीची प्रणाली आहे. सूर्य हा आपल्या ऊर्जेचा स्त्रोत आहे. समृद्धी शेवाळ हा पृथ्वीचा ऑक्सिजनचा सर्वांत मोठा स्त्रोत आहे.
मी माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवेन, तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्या एकल वापर प्लॅस्टिकसारख्या उत्पादनांचा वापर करणार नाही. कारण, हे प्लॅस्टिक कुजत नाही आणि ओढे, नदी आणि नंतर समृद्धी जीवनास हानिकारक ठरत आहे.
पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी पिण्यालायक आहे, याची मला जाणीव आहे. म्हणून मी शाळेत आणि घरात पाण्याचा काटकसरीने वापर करेन. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण आणि पुनर्वापर, तसेच अन्य वस्तूंचा पुनर्वापर करून मी पर्यावरणपूरक संस्कृतीला प्रोत्साहन देईन. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या माध्यमातून मी पाण्याचे संवर्धन करेन आणि हाच संदेश कुटुंब आणि मित्रांपर्यंत पोहोचवेन.
मी कोळसा जाळून बनविलेल्या ऊर्जेचा वापर कमी करेन आणि त्यासाठी सौर, बायोगॅस इ. ऊर्जेचा वापर करण्याचा मी शक्य तेवढा प्रयत्न करेन.
मी माझ्या परिसरातील जीवांच्या विविधतेला समजून घेईन, माझ्यामुळे इतर जीवांना कमीत कमी त्रास होईल यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन.
एक मोठे झाड प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे दरवर्षी २० किलो कार्बन डायॉक्साईड शोषून घेते. याच क्रियेद्वारे प्रत्येक मोठे झाड प्रतिवर्षी १४ किलो ऑक्सिजन देते.
मी स्वतः दहा मोठ्या होणाऱ्या झाडांची लागवड आणि जोपासना करेन. तसेच माझे पालक, भाऊ आणि बहिणी, तसेच माझे शेजारी दहा झाडांची लागवड आणि जोपासना करतील, याची दक्षता घेईन. या मोहिमेतील एक दूत म्हणून मी काम करेन.
माझे घर, परिसर आणि विद्यार्थी मित्रांमध्ये मी पर्यावरण संवर्धनविषयक जागरूकता निर्माण करेन. मोठेपणी मी ज्या कोणत्याही व्यवसायात जाईन, तिथे पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन होईल असे निर्णय घेईन.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
पर्यावरण राजदूत, यांनी दिलेल्या प्रतिज्ञेपासून प्रेरित.
No comments:
Post a Comment