प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती वजनाने हलक्या व आकर्षक असल्या तरी प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची हानी होते. कार्यशाळेची सुरुवात प्लास्टर ऑफ पॅरिसबद्दल मुलांसोबत पर्यावरण जागृतीपर चर्चा करून झाली. वर्गशिक्षिका सौ. योगिता बच्छाव यांनी स्वतः शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून विद्यार्थ्यांनाही प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेऊन आपापल्या कलागुणांना वाव मिळवून दिला.
मार्गदर्शक : सौ. योगिता बच्छाव
No comments:
Post a Comment