स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना स्वरचित कवितेतून अभिवादन करण्यासाचा प्रयत्न...
माय जिजाऊ...!!
शक्तिरुप आदिशक्ती तू,
रणातील वीरांगना तू,
रयतेची सावली तू,
हुशार मुसद्दी... राज्यकर्ती तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
जाधावांचा मान तू,
भोसल्यांची रणरागिणी तू,
अखंड मामतेचा झरा तू,
शिवबाची... तळपती तालावर तू,
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
सह्याद्रीच्या कडेकपारींची धार तू,
मराठ्यांचा अभेद्य वार तू,
कृपेची प्रेमळ माऊली तू,
शहाजीची... सावली तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
निर्भिड संस्कारांची खान तू,
हट्टी मरहट्ट्यांचा प्राण तू,
शिवबांचा स्वाभिमान तू,
नारी शक्तीचा... अभिमान तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
स्वराज्याची प्रबळ मार्गदर्शक तू,
अखंड स्वराज्याचा पाया तू,
अवघ्या महाराष्ट्राची शान तू,
कर्तृत्ववान स्त्री... राजमाता तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
अविरत धगधगती आग तू,
सकल मावळ्यांची माय तू,
साऱ्या मराठ्यांची आस तू.
संभाजी छाव्याचीही... आऊसाहेब तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
अथांग ज्ञानाची सरिता तू,
विलक्षण चातुर्याची गंगा तू,
दिन दुबळयांची माय तू,
सदैव कुशल... संघटक तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!
©️ रचना : सौ. योगिता बच्छाव
No comments:
Post a Comment