वायुप्रदुषण जनजागृती दिन
वायू हा पंचमहाभुतांतील एक महाभुत आहे. वायु हा जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतो. प्राणवायू कमी मिळाला तर सजीवांना जगणे अशक्य असते. अन्न व पाणी यांच्याशिवाय काही काळ काढता येते. पण हवेविना जगता येत नाही.
हवा ही आपल्याला मोफत मिळत असल्याने आपल्याला तिची किंमत नाही. त्यामुळे आपल्याकडून ती अनेकदा दुषित केली जाते. शहरात असे कारखाने असतात की, त्यांतून सोडलेल्या विषारी वायुमुळे हवा प्रदुषित होते. त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच सहन करावे लागतात. वायुप्रदुषणामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात. वेगवेगळ्या साधीच्या आजारांचा प्रसार होतो.
वायुप्रदुषणामुळे काही लोकांना त्वचारोग होतात. साफसफाईची कामे करणाऱ्यांना पुष्कळदा वायुप्रदुषणामुळे मृत्युही येतो. खाणीत काम करणाऱ्यांना हा धोका जास्त संभवतो. तेव्हा वायुप्रदुषण होऊ नये याची मानवानेच काळजी घ्यायला हवी.
आपल्या पृथ्वीवर हवा मुबलक स्वरूपात आहे त्यामुळेच सजीवसृष्टीमध्ये भरपुर विविधता आढळते. परंतु अलीकडच्या काळात औद्योगीकरण शहरीकरण, लोकसंख्यावाढ यांमुळे हवेचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. पृथ्वीभोवती वातावरणामध्ये मुख्यत्वेकरून नायट्रोजन, ऑक्सिजन्, कार्बन डायऑक्साइड व इतर वायूंचे प्रमाण व पाण्याची वाफ अल्पप्रमाणात आढळते. सर्व सजीवांसाठी हवेतील हे वायु घटक अत्यावश्यक असतात. म्हणूनच हवेच्या या वातावरणाला जीवसृष्टीचे संरक्षक क्षेत्र असाच उल्लेख करता येईल. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणातील हवेत विविध दुषित घटक मिसळल्यामुळे त्याला आपण 'हवा प्रदूषण' असे म्हणतो, हवेचे प्रदूषण ही समस्या औद्योगिक युगाच्या सुरुवातीस प्रकर्षाने जाणवू लागली. प्रदुषण वाढण्यास विविध कारखाने, विविध उत्पादन प्रक्रिया, उद्योगधंदे, वाहतुक व्यवस्थेतील वाहनांची प्रचंड वाढ व साधनसंपदांच्या अपरिमीत उपभोगामुळे हवा प्रदुषणाची समस्या गंभीर होत आहे.
वायु प्रदुषणामुळे वनस्पती, प्राणी जीवन, मानवी जीवन आरोग्यावर तसेच ऐतिहासिक वास्तूंवर विपरीत परिणाम होतो. तसेच हवेचे प्रदूषण दोन प्रकारे होते.
(अ) नैसर्गिक प्रदूषण - वादळे, वणवे, ज्वालामुखी, अवर्षण इत्यादी घडामोडीमुळे हवेचे प्रदूषण होते. अर्थात निसर्गतःच या प्रदुषणावर उपाययोजना होत असतात.
(ब) मानवनिर्मित हवा प्रदुषण - विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचालित वाहने, इ. विविध प्रकारांमुळे हवेचे सातत्याने प्रदुषण होत आहे.
नाव : वृषाली सोमनाथ येलमामे
इयत्ता : ७ वी - अ
म.न.पा. शाळा क्र. ८९,
पाथर्डी, फाटा नाशिक
No comments:
Post a Comment