Breaking

Wednesday, 7 February 2024

हवा प्रदूषण निबंध

हवा प्रदूषण

आजच्या युगामध्य औद्योगीकीकरणाचे कारखान्यांचे तसेच, वाहनांचे प्रमाण इतके वाढले आहे की त्याच्यामुळ निर्माण होणारे वायू प्रदूषण हे त्याच्या संबंधित कारणीभूत घटकांच्या दुप्पट पटीने वाढत आहे.

सध्याच्या युगात सततपणे होणाऱ्या व हवामानाच्या बदलास जबाबदार असणारे अनेक घटकच आजच्या वाढत्या वायुप्रदूषणाला देखील कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा वायू कण आणि अनेक जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांचा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो. तेव्हा वायुप्रदूषण ही समस्या उद्भवते. शिवाय विविध अशा प्रकारचे रोग, अलर्जी, शिवाय कित्येक वेळा मृत्यू यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते.

त्याचबरोबर, इतर सजीवांना देखील जसे की प्राणी, पक्षी शेतातीत्य अन्न पिके, विविध फुलांच्या वनस्पती यांनाही मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी पोहोचवू शकते. एकंदरीत नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांना हवा प्रदूषण हे भरपूर प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. खरंतर, मानवी क्रिया भरपूर प्रमाणावर वायूप्रदूषण निर्माण करू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अलीकडच्या काळात केवळ मानवानर्मित वातावरणातीत्य हवा प्रदूषणामुळे जवळजवळ 2.1 दशलक्ष ते 4.21 दशलक्ष इतक्या लोकांचा अकाली मृत्यू  झाला आहे. अशा या हवा प्रदूषणास जबाबदार अथवा कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषित घटकांना प्रदूषके असे म्हणतात.

तसेच, नैसर्गिक हवेतील जे पदार्थ मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती, किटक अथवा उपयुक्त जंतू इ. जीवांच्या आरोग्यास आणि त्यांच्या जीवनास खूप हानिकारक आहेत, त्याचबरोबर जे पदार्थ हवामान बदलास देखील  कारणीभूत आहेत, त्या पदार्थांना प्रदूषक घटक असे म्हटले जाते.

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...