Breaking

Wednesday, 7 February 2024

हवा प्रदुषण, जनजागृती निबंध

हवा प्रदुषण, जनजागृती निबंध

हवा ही देणगी सर्व सजीवसृष्टीची आधारशिला आहे. आपल्या पृथ्वीतलावर हवा मुबलक स्वरूपात आहे. त्यामुळे सजीवसृष्टीमध्ये भरपूर विविधता आढळते. परंतू अलीकडच्या काळात औद्योगीकरण, शहरीकरण, लोकसंख्यावाढ इ. मुळे हवेचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

पृथ्वीभोवती वातावरणामध्ये मुख्यत्वेकरून नायट्रोजन, ऑक्सिजन कार्बन-डायऑक्साईड, पाण्याची वाफ व इतर वायूचे प्रमाण अत्य- अल्प आढळते. सर्व सजीवांसाठी हवेतील हे वायू घटक अत्यावश्यक असतात. म्हणूनच हवेच्या या वातावरणाला जीवसृष्टीचे संरक्षक क्षेत्र असाच उल्लेख करता येईल. परंतु मानवी हस्तक्षेपामुळ वातावरणातील हवेत विविध दुषित घटक मिसळल्यामुळे हवा दूषित होत आहे. यालाच आपण 'हवा प्रदूषण' असे म्हणतो.

हवेचे प्रदूषण ही समस्या, औद्योगिक युगाच्या सुरुवातीस प्रकर्षाने जाणवू लागली. लोकसंख्यावाढी बरोबरच औद्योगीकरण, शहरीकरणामुळे हवा प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदुषण वाढण्यास विविध कारखाने, विविध उत्पादन प्रक्रिया, उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्थेतील वाहनांची प्रचंड वाढ व साधनसंपदांचा अपरिमीत उपभोगामुळे हवा प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे.

प्रत्येक‌ लहान-मोठ्‌या कारखान्याभोवती हरित पट्टा निर्माण करण्याचे कडक नियम व त्यांची अंबलबजावणी झाली पाहिजे. तसेच प्रदूषण कसे कमीत कमी होईल याकडे कारखान्याच्या मालकांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच, त्यासाठी लोकजीवन ही अतिशय महत्वाची बाब असल्याने वाहनाची देखभाल स्वतःच कशी करता येईल. याची माहिती प्रत्येक वाहनचालकांना देऊन हवा प्रदूषण कमी करता येईल. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांच्याही सहकार्याने प्रदूषण नियंत्रण करता येणे सहज शक्य होऊ शकते.

नाव - पायल अमोल पाईकराव

इयत्ता : ७ वी - अ

म.न.पा. शाळा क्र. ८९,

पाथर्डी, फाटा नाशिक

No comments:

Post a Comment

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...