रतन टाटा प्रश्नमंजुषा | Ratan-Tata-quiz
रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती व दानशूर व्यक्तीमत्व होते. ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. त्यांच्या उत्पन्नाचा नफ्यातील काही भाग ते विविध धर्मादाय उपक्रमांना देत असत. देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा रतन टाटा हे मदत करण्यास अग्रस्थानीच राहत असत. केवळ मानवजातीचे कल्याण न बघता प्राणीमात्रांवर दया करणारे ते एक महान व्यक्तिमत्व होते.