Breaking

Tuesday, 30 January 2024

January 30, 2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रश्नमंजुषा | Rashtrapita Mahatma Gandhi Quiz

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी हे एक समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात अहिंसेचे पालन केले. महात्मा गांधी यांचा जीवन परिचय आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून ही प्रश्नमंजुषा...

Friday, 26 January 2024

January 26, 2024

प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम - म. न. पा. शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा नाशिक

म. न. पा. शाळा क्र. 89 प्रशांत नगर पाथर्डी फाटा येथे इयत्ता सातवीची विद्यार्थिनीने वृषाली येलममे हिने बेटी हिंदुस्तान की... हे सुंदर गीत सादर केले.

January 26, 2024

प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम गीत गायन - म. न. पा. शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा नाशिक

म. न. पा. शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा येथे इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थांनी we shall overcome come... हे सुंदर गीत सादर केले.

January 26, 2024

प्रजासत्ताक दिन देशभक्ती गीत गायन ए मेरे वतन के लोगो - NMC शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा नाशिक

NMC शाळा क्रं,89 पाथर्डी फाटा येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यानी ने ए मेरे वतन के लोगो.... हे सुंदर गीत गायन केले.

January 26, 2024

प्रजासत्ताक दिन विद्यार्थी मराठी भाषण - म. न. पा. शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा नाशिक

NMC शाळा क्रं 89 प्रशांत नगर पाथर्डी फाटा येथे इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थांनीने आजचा आपला भारत या विषयावर प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर भाषण केले.

January 26, 2024

प्रजासत्ताक दिन विद्यार्थी हिंदी भाषण

NMC शाळा क्र. 89 प्रशांत नगर पाथर्डी फाटा येथे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी पायल पाईकराव हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदीतून मेरा हिंदुस्तान हे छान भाषण केले.

Wednesday, 24 January 2024

January 24, 2024

प्रजासत्ताक दिन विद्यार्थी प्रश्नमंजुषा | निर्मिती - सौ. योगिता बच्छाव, म. न. पा. शाळा क्र. 89, प्रशांत नगर, पाथर्डी फाटा, नाशिक

प्रजासत्ताक दिन विद्यार्थी प्रश्नमंजुषा | निर्मिती - सौ. योगिता बच्छाव, म. न. पा. शाळा क्र. 89, प्रशांत नगर, पाथर्डी फाटा, नाशिक

Friday, 19 January 2024

January 19, 2024

आनंददायी शिक्षण | भारत राज्य व राजधान्या | केंद्रशासित प्रदेश राज्य व राजधान्या


शिकण्याचा आनंद देणारे
आनंददायी शिक्षण

म. न. पा. शाळा क्रमांक 89, प्रशांत नगर, पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी स्वअनुभवातून आनंद घेतला आनंददायी शिक्षणाचा...
नेहमीप्रमाणे शिक्षक, पुस्तक, वह्या यात स्वतःला गुंतवून न घेता विद्यार्थ्यांनी एका नव्या मार्गाने आनंददायी शिक्षणाचा केवळ अनुभवच घेतला नाहीतर प्रत्येक विद्यार्थ्याने यात सहभागी होत विविध रूपे साकारत भारत, राज्य, राजधान्या, केंद्रशासित प्रदेश राज्य व राजधान्या याचा अभ्यास केला.

Wednesday, 17 January 2024

January 17, 2024

आझादी - प्रजासत्ताक दिन पथनाट्य | 26 जानेवारी पथनाट्य | मार्गदर्शिका - सौ. योगिता बच्छाव

प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले गेले. २६ जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली.

आझादी विषयावर आधारित तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य...

मार्गदर्शिका : सौ. योगिता बच्छाव

Monday, 15 January 2024

January 15, 2024

सावित्रीबाई फुले पथनाट्य | आम्ही सावित्रीच्या लेकी आम्हा नाही कुणाची भीती

पथनाट्य : आम्ही सावित्रीच्या लेकी आम्हा नाही कुणाची भीती 

बालिका दिन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

मनपा शाळा क्रं 87 पाथर्डीगाव  नाशिक 

मार्गदर्शिका : सौ.योगिता बच्छाव मॅडम

January 15, 2024

7 वी गणित प्रकरण 11 वर्तुळ | 7th Math - Circle - Chapter 11 | 7 वी गणित वर्तुळ

विद्यार्थ्याना वर्तुळाचा परिघ हा भाग अतिशय सोप्या पद्धतीने समजला जातो. कृतीतून गणित विषयाचे शिक्षण दिले तर विद्यार्थांना गणित विषयाची गोडी लागते. आवडीने गणित सोडवण्यात सहभागी होतात.

Friday, 12 January 2024

January 12, 2024

माय जिजाऊ कविता, शक्तिरुप आदिशक्ती तू | सौ. योगिता बच्छाव


स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना स्वरचित कवितेतून अभिवादन करण्यासाचा प्रयत्न...

माय  जिजाऊ...!!
 
शक्तिरुप आदिशक्ती तू,
रणातील वीरांगना तू,
रयतेची सावली तू,
हुशार मुसद्दी... राज्यकर्ती तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

जाधावांचा मान तू,
भोसल्यांची रणरागिणी तू,
अखंड मामतेचा झरा तू,
शिवबाची... तळपती तालावर तू,
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

सह्याद्रीच्या कडेकपारींची धार तू,
मराठ्यांचा अभेद्य वार तू,
कृपेची प्रेमळ माऊली तू,
शहाजीची... सावली तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

निर्भिड संस्कारांची खान तू,
हट्टी मरहट्ट्यांचा प्राण तू,
शिवबांचा स्वाभिमान तू,
नारी शक्तीचा... अभिमान तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

स्वराज्याची प्रबळ मार्गदर्शक तू,
अखंड स्वराज्याचा पाया तू,
अवघ्या महाराष्ट्राची शान तू,
कर्तृत्ववान स्त्री... राजमाता तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

अविरत धगधगती आग तू,
सकल मावळ्यांची माय तू,
साऱ्या मराठ्यांची आस तू.
संभाजी छाव्याचीही... आऊसाहेब तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

अथांग ज्ञानाची सरिता तू,
विलक्षण चातुर्याची गंगा तू,
दिन दुबळयांची माय तू,
सदैव कुशल... संघटक तू.
माय जिजाऊ तू, माय जिजाऊ तू !!

©️ रचना : सौ. योगिता बच्छाव

Tuesday, 9 January 2024

January 09, 2024

राजमाता जिजाऊ प्रश्नमंजुषा | Rajmata Jijau Quiz

विद्यार्थ्यांना स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या जीवनातील ठळक घटनांविषयी परिचय व्हावा या उद्देशाने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा 

January 09, 2024

स्वामी विवेकानंद प्रश्नमंजुषा १ | Swani Vivekanand Quiz

स्वामी विवेकानंद प्रश्नमंजुषा | Swani Vivekanand Quiz 2

विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या जीवनातील ठळक घटनांविषयी परिचय व्हावा या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...