Breaking

Wednesday, 28 February 2024

February 28, 2024

मराठी भाषा गौरव दिन नृत्य सादरीकरण क्षणचित्रे | Marathi Bhasha Gaurav Din Dance | म. न. पा. शाळा क्र. ८९, पाथर्डी फाटा, नाशिक

मराठी भाषा गौरव दिन नृत्य सादरीकरण क्षणचित्रे | Marathi Bhasha Gaurav Din Dance | म. न. पा. शाळा क्र. ८९, पाथर्डी फाटा, नाशिक

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी मातीचा गोडवा गाणाऱ्या गीताच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा...

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।

प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।

नृत्य सादरीकरण क्षणचित्रे...

Sunday, 25 February 2024

February 25, 2024

फुलोरा - विद्यार्थी स्वरचित मराठी काव्य संग्रह | मराठी भाषा गौरव दिन उपक्रम | Fulora-Vidyarthi-Kawyasangrah

विद्यार्थ्यांनी तयार केला स्वतः लिहिलेल्या कवितांचा काव्यसंग्रह

फुलोरा - स्वरचित मराठी काव्य संग्रह

February 25, 2024

मराठी भाषा गौरव दिन प्रश्नमंजुषा | कविश्रेष्ठ कुसुमाग्रज प्रश्नमंजुषा | Marathi-Bhasha-Gaurav-Din-Quiz

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानेच विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या जीवनाविषयी माहिती व्हावी याउद्देशाने तयार करण्यात आलेली प्रश्नमंजुषा आपल्या  विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य पोहचवा...


February 25, 2024

वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा | राष्ट्रीय विज्ञान दिन उपक्रम

National Science Day

म.न.पा. शाळा क्र. 89 पाथर्डी फाटा येथे राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी इयत्ता सातवीच्या वर्गात वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभागी होऊन खुप सुंदर रांगोळ्या काढल्या.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

👇👇👇👇

CLICK HERE

Thursday, 22 February 2024

February 22, 2024

वनस्पतीच्या पानांच्या पेशींची रचना संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली अभ्यासणे

म. न. पा. शाळा क्र. ८९, प्रशांत नगर, नाशिक येथील सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील वनस्पतीच्या पानांच्या पेशींची रचना प्रत्यक्ष प्रयोगातून सूक्ष्मदर्शी खाली दाखविण्यात आली.

Wednesday, 21 February 2024

February 21, 2024

शिवजयंतीचे तुफान धडाकेबाज भाषण | शिवजयंती मराठी भाषण | कु. वृषाली सोमनाथ येलमामे

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इ. ७ वीच्या विद्यार्थिनीने केलेले तुफान धडाकेबाज भाषण...

कु. वृषाली सोमनाथ येलमामे

February 21, 2024

शिवजयंतीचे तुफान धडाकेबाज भाषण | शिवजयंती मराठी भाषण | कु. पायल अमोल पाईकराव


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इ. ७ वीच्या विद्यार्थिनीने केलेले तुफान धडाकेबाज भाषण...

कु. पायल अमोल पाईकराव

Monday, 19 February 2024

Saturday, 17 February 2024

February 17, 2024

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा | निर्मिती - सौ योगिता बच्छाव, म. न. पा. शाळा क्र. 87 पाथर्डी गाव, नाशिक

स्वराज्य निर्माते व स्वराज्याचे पहिले छत्रपती, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती आपण प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

Wednesday, 7 February 2024

February 07, 2024

स्वच्छ भारत अभियान हिंदी निबंध

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान भारत सरकारद्वारा भारत को स्वच्छ बनाने के लिए चलाया गया एक राष्ट्रीय स्तर का अभियान है। भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी ने इस अभियान कि शुरुआत की थी। राष्ट्रपिता महात्मा गांधी का सूपना था कि हमारा देश एक स्वच्छ देश बने। इस वजह से स्वच्छ भारत अभियान को महात्मा गांधी कि 145 वीं जयंती - 2 अक्टूबर 2014 को राजघाट, नई दिल्ली में शुरू किया गाय था
इस अभियान का लक्ष्य महात्मा गांधी 150 वीं जयंती (2 अक्टूबर 2019) तक भारत को स्वच्छ बनाना था अभियान में ग्रामीण क्षेत्रों में अभियान स्वच्छता कार्यक्रमों को बढावा देना था अभियान में सड़कों की सफाई, शौचालय का निर्माण आदि कार्य शामिल है। स्वच्छ भारत अभियान का उद्देश्य देश के गांवो, कस्बों और शहरों की सफाई करना है। अभियान का मुख्य उद्देश्य व्यक्तीगत और सामुदायिक शौचालयों का निर्माण करके, खुले में शौच को रोकना है।
इस अभियान का उद्देश्य यह भी हैं कि लोगों में स्वच्छता के प्रति जागरूकता पैदा कि जा सके। स्वच्छता अभियान की शुरवात करते हुए, माननीय प्रधान मंत्री श्री मोदीजीने सडको कि सफाई की। उन्होने भारतीय नागरीको को अपने परिसर कि स्वच्छता की जिम्मेदारी लेने के लिए प्रेरित किया। भारत को एक स्वच्छ देश बनाने के लिए भारत सरकार हर संभव कदम उठा रही है
स्वच्छ भारत अभियान को सफल बनाने के लिए हम नागरिकों कि भी स्वच्छता के प्रति प्रतिबद्‌ध रहने और इसके लिए समय समर्पित करने की आवश्यकता है। श्रमदान करके हम सब भारतवासी अपने गली मोहल्लों को साफ रख सकत है। जिससे की पूरा भारत स्वच्छ और साफ़ रहेगा। स्वच्छता मनुष्य के जीवन में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। गांधी जी ने स्वच्छता को सेवा का भाव कहा था। स्वच्छ मनुष्यही स्वच्छ समाज की नींव रख सकते है
लोगो को अपने आस - पास के साथ - साथ घरो को भी साफ रखना चाहिए।
स्वच्छ भारत अभियान को 2 अक्टूबर 1914 को शुरू किया था। स्वच्छ भारत अभियान का मकसद भारत को गन्दगी मुक्त बनाना है। विश्वस्तर पर आयरलैंड सबसे स्वच्छ देश है। विश्वस्तर पर भारत स्वच्छ देशो की सूची में 98 वें स्थान पर स्थित है। स्वच्छता की आवश्यकता व्यक्ति और समाज दोनो को है।
"हर नागरिक का हो ये सपना,
स्वच्छ हो सम्पूर्ण भारन अपना"
नाव : प्रथमेश कांबळे

इयत्ता : ७ वी - अ

म.न.पा. शाळा क्र. ८९,

पाथर्डी, फाटा नाशिक

February 07, 2024

वायुप्रदुषण जनजागृती दिन निबंध

वायुप्रदुषण जनजागृती दिन

वायू हा पंचमहाभुतांतील एक महाभुत आहे. वायु हा जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतो. प्राणवायू कमी मिळाला तर सजीवांना जगणे अशक्य असते. अन्न व पाणी यांच्याशिवाय काही काळ काढता येते. पण हवेविना जगता येत नाही.

हवा ही आपल्याला मोफत मिळत असल्याने आपल्याला तिची किंमत नाही. त्यामुळे आपल्याकडून ती अनेकदा दुषित केली जाते. शहरात असे कारखाने असतात की, त्यांतून सोडलेल्या विषारी वायुमुळे हवा प्रदुषित होते. त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच सहन करावे लागतात. वायुप्रदुषणामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात. वेगवेगळ्या साधीच्या आजारांचा प्रसार होतो.

वायुप्रदुषणामुळे काही लोकांना त्वचारोग होतात. साफसफाईची कामे करणाऱ्यांना पुष्कळदा वायुप्रदुषणामुळे मृत्युही येतो. खाणीत काम करणाऱ्यांना हा धोका जास्त संभवतो. तेव्हा वायुप्रदुषण होऊ नये याची मानवानेच काळजी घ्यायला हवी.

आपल्या पृथ्वीवर हवा मुबलक स्वरूपात आहे त्यामुळेच सजीवसृष्टीमध्ये भरपुर विविधता आढळते. परंतु अलीकडच्या काळात औद्योगीकरण शहरीकरण, लोकसंख्यावाढ यांमुळे हवेचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. पृथ्वीभोवती वातावरणामध्ये मुख्यत्वेकरून नायट्रोजन, ऑक्सिजन्, कार्बन डायऑक्साइड व इतर वायूंचे प्रमाण व पाण्याची वाफ अल्पप्रमाणात आढळते. सर्व सजीवांसाठी हवेतील हे वायु घटक अत्यावश्यक असतात. म्हणूनच हवेच्या या वातावरणाला जीवसृष्टीचे संरक्षक क्षेत्र असाच उल्लेख करता येईल. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणातील हवेत विविध दुषित घटक मिसळल्यामुळे त्याला आपण 'हवा प्रदूषण' असे म्हणतो, हवेचे प्रदूषण ही समस्या औद्योगिक युगाच्या सुरुवातीस प्रकर्षाने जाणवू लागली. प्रदुषण वाढण्यास विविध कारखाने, विविध उत्पादन प्रक्रिया, उद्योगधंदे, वाहतुक व्यवस्थेतील वाहनांची प्रचंड वाढ व साधनसंपदांच्या अपरिमीत उपभोगामुळे हवा प्रदुषणाची समस्या गंभीर होत आहे.

वायु प्रदुषणामुळे वनस्पती, प्राणी जीवन, मानवी जीवन आरोग्यावर तसेच ऐतिहासिक वास्तूंवर विपरीत परिणाम होतो. तसेच हवेचे प्रदूषण दोन प्रकारे होते.

(अ) नैसर्गिक प्रदूषण - वादळे, वणवे, ज्वालामुखी, अवर्षण इत्यादी घडामोडीमुळे हवेचे प्रदूषण होते. अर्थात निसर्गतःच या प्रदुषणावर उपाययोजना होत असतात.

(ब) मानवनिर्मित हवा प्रदुषण - विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचालित वाहने, इ. विविध प्रकारांमुळे हवेचे सातत्याने प्रदुषण होत आहे.

नाव : वृषाली सोमनाथ येलमामे

इयत्ता : ७ वी - अ

म.न.पा. शाळा क्र. ८९,

पाथर्डी, फाटा नाशिक

February 07, 2024

हवा प्रदूषण निबंध

हवा प्रदूषण

आजच्या युगामध्य औद्योगीकीकरणाचे कारखान्यांचे तसेच, वाहनांचे प्रमाण इतके वाढले आहे की त्याच्यामुळ निर्माण होणारे वायू प्रदूषण हे त्याच्या संबंधित कारणीभूत घटकांच्या दुप्पट पटीने वाढत आहे.

सध्याच्या युगात सततपणे होणाऱ्या व हवामानाच्या बदलास जबाबदार असणारे अनेक घटकच आजच्या वाढत्या वायुप्रदूषणाला देखील कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा वायू कण आणि अनेक जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांचा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो. तेव्हा वायुप्रदूषण ही समस्या उद्भवते. शिवाय विविध अशा प्रकारचे रोग, अलर्जी, शिवाय कित्येक वेळा मृत्यू यांसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते.

त्याचबरोबर, इतर सजीवांना देखील जसे की प्राणी, पक्षी शेतातीत्य अन्न पिके, विविध फुलांच्या वनस्पती यांनाही मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी पोहोचवू शकते. एकंदरीत नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटकांना हवा प्रदूषण हे भरपूर प्रमाणात नुकसान पोहोचवू शकते. खरंतर, मानवी क्रिया भरपूर प्रमाणावर वायूप्रदूषण निर्माण करू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अलीकडच्या काळात केवळ मानवानर्मित वातावरणातीत्य हवा प्रदूषणामुळे जवळजवळ 2.1 दशलक्ष ते 4.21 दशलक्ष इतक्या लोकांचा अकाली मृत्यू  झाला आहे. अशा या हवा प्रदूषणास जबाबदार अथवा कारणीभूत ठरणाऱ्या प्रदूषित घटकांना प्रदूषके असे म्हणतात.

तसेच, नैसर्गिक हवेतील जे पदार्थ मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती, किटक अथवा उपयुक्त जंतू इ. जीवांच्या आरोग्यास आणि त्यांच्या जीवनास खूप हानिकारक आहेत, त्याचबरोबर जे पदार्थ हवामान बदलास देखील  कारणीभूत आहेत, त्या पदार्थांना प्रदूषक घटक असे म्हटले जाते.

February 07, 2024

हवा प्रदुषण, जनजागृती निबंध

हवा प्रदुषण, जनजागृती निबंध

हवा ही देणगी सर्व सजीवसृष्टीची आधारशिला आहे. आपल्या पृथ्वीतलावर हवा मुबलक स्वरूपात आहे. त्यामुळे सजीवसृष्टीमध्ये भरपूर विविधता आढळते. परंतू अलीकडच्या काळात औद्योगीकरण, शहरीकरण, लोकसंख्यावाढ इ. मुळे हवेचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे.

पृथ्वीभोवती वातावरणामध्ये मुख्यत्वेकरून नायट्रोजन, ऑक्सिजन कार्बन-डायऑक्साईड, पाण्याची वाफ व इतर वायूचे प्रमाण अत्य- अल्प आढळते. सर्व सजीवांसाठी हवेतील हे वायू घटक अत्यावश्यक असतात. म्हणूनच हवेच्या या वातावरणाला जीवसृष्टीचे संरक्षक क्षेत्र असाच उल्लेख करता येईल. परंतु मानवी हस्तक्षेपामुळ वातावरणातील हवेत विविध दुषित घटक मिसळल्यामुळे हवा दूषित होत आहे. यालाच आपण 'हवा प्रदूषण' असे म्हणतो.

हवेचे प्रदूषण ही समस्या, औद्योगिक युगाच्या सुरुवातीस प्रकर्षाने जाणवू लागली. लोकसंख्यावाढी बरोबरच औद्योगीकरण, शहरीकरणामुळे हवा प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदुषण वाढण्यास विविध कारखाने, विविध उत्पादन प्रक्रिया, उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्थेतील वाहनांची प्रचंड वाढ व साधनसंपदांचा अपरिमीत उपभोगामुळे हवा प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे.

प्रत्येक‌ लहान-मोठ्‌या कारखान्याभोवती हरित पट्टा निर्माण करण्याचे कडक नियम व त्यांची अंबलबजावणी झाली पाहिजे. तसेच प्रदूषण कसे कमीत कमी होईल याकडे कारखान्याच्या मालकांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच, त्यासाठी लोकजीवन ही अतिशय महत्वाची बाब असल्याने वाहनाची देखभाल स्वतःच कशी करता येईल. याची माहिती प्रत्येक वाहनचालकांना देऊन हवा प्रदूषण कमी करता येईल. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांच्याही सहकार्याने प्रदूषण नियंत्रण करता येणे सहज शक्य होऊ शकते.

नाव - पायल अमोल पाईकराव

इयत्ता : ७ वी - अ

म.न.पा. शाळा क्र. ८९,

पाथर्डी, फाटा नाशिक

Saturday, 3 February 2024

February 03, 2024

How to make English School Magazine | इंग्रजी स्कूल मॅगझिन तयार करणे

STD. - 7th
English School Magazine
म. न. पा. शाळा क्र. 89, पाथर्डी फाटा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या English Magazine ह्या घटकावर आधारीत स्वतःच्या शाळेची आकर्षक अशी School Magazine...
व्हिडिओ आवर्जून बघा 👍🏻

डान्सिंग डॉल तयार करणे | पेपर डॉल | नवरात्री स्पेशल उपक्रम | dandiya-dancing-doll-activity

भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रीचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्र म्हटले की दांडिया खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या...