लालबहादूर शास्त्री प्रश्नमंजुषा | Lalbahadur-Shastri-Quiz
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ साली मुगलसराय येथे झाला. लालबहादूर शास्त्री समंजस, विवेकी आणि नैतिक मुल्ये जपणारे होते. त्यांना अन्याय अजिबात सहन होत नसे. शिक्षण चालू असताना त्यांना महात्मा गांधीजींचे भाषण ऐकण्याचा योग आला. गांधीजींच्या भाषणाचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते.